You Are a Badass: How to Stop Doubting Your Greatness and Start Living an Awesome Life (Marathi)

You Are a Badass: How to Stop Doubting Your Greatness and Start Living an Awesome Life (Marathi)

आपल्या लेखिका जेन सिंचेरी दिवसभर टीव्ही पाहण्यात आपला वेळ वाया घालवत. पण त्यांना एकेदिवशी हे रियलाइज झालं की आता हे थांबवले पाहिजे आणि मग काही काळातच त्या यातून बाहेर देखील आल्या.

मित्रांनो, आपल्या लेखिका कशा पद्धतीने एक  यशस्वी, खुश व कॉन्फिडेन्ट महिला बनल्या याचे वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे. हे पुस्तक तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवेल. तसेच जे नियम आपल्याला बांधुन ठेवतात त्यांना कसं बदलायला हवं हे देखील तुम्हाला या पुस्तकात शिकायला मिळेल.

छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँकफुल रहा, स्वतःच मन मोठं करून लोकांसोबत गोष्टी शेअर करा आणि इतरांना माफ करायची प्रवृत्ती ठेवा, मनात अशा विचारांना जागा द्या जे तुमचे जीवन सुंदर  व कमालीचं करण्यात मदत करतील.

My Subconscious Made Me Do It

जेव्हा आपला जन्म झाला, तेव्हा आपण फक्त एक कपड्यात गुंडाळलेले निरागस मूल होतो, जे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे ,सर्वांना खुश करायचे. त्यावेळी आपल्या सुंदर डोळ्यांत भूतकाळातील दु:ख वा उद्याची चिंता नव्हती.

आपल्यासाठी सगळं काही नवीन होते, म्हणून आपण सर्व काही पाहून आश्चर्यचकित व्हायचो. पण जसं जसं आपण मोठे होत गेलो तसं तसं आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून नवीन गोष्टी शिकू लागलो.

आपल्या कुटुंबाच्या विचारांचा आपल्यावर मोठा प्रभाव पडतो आणि आपले कुटुंब आपल्याला जे काही करायला, शिकायला लावते, आपण ते सगळं शिकायला सुरवात करतो. ते विचार बरोबर आहेत की नाही ह्याची पडताळणी न करता, आपण त्यांना सत्य मानतो.

आणि आपण त्या सगळया नियमांचे अनुकरण करण्यास सुरवात करतो. जेव्हा कोणी तरी आपल्याला येऊन सांगतं, तुम्ही खूप जाड आहात किंवा आता तुम्हाला महाविद्यालयात जाण्याची गरज आहे किंवा आर्टिस्ट (कलाकार) क्षेत्रात आपले करिअर बनवू नका, तेव्हा आपण त्या गोष्टींवर नीट विचार न करता त्यांना आहे तशा स्वीकारतो.

हे अगदी खरं आहे की तुमचे पालक तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि ते नेहमी तुमच्या भल्याचा विचार करतात. त्यांनी या गोष्टी त्यांच्या पालकांकडून  शिकल्या असतील.

त्यांची विचारसरणी ही एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात राहते. म्हणजेच आपण अशा जगात आहोत, जेथे आपल्याला आपल्या आधी जन्मलेल्या लोकांच्या विचारसरणी आणि नियमांचा स्वीकार करावा लागतो. आणि करतोही.

पण हे पुस्तक आपल्याला त्यातील काही जुन्या व चुकीच्या  नियमांना कसे मोडायचे आणि नवीन नियम कसे बनवायचे हे शिकवेल. कदाचीत तुम्ही म्हणाल की हे नियम मोडण्याची गरज आहे का? हो गरज आहे! कारण हे तुमचे जीवन आहे आणि त्याला आनंदात घालवणे खूप गरजेचे आहे.

चला सुरूवात करूया…

आपल्या माइंड चे 3 लेव्हलस् आहेत ज्याला कॉन्शियस माइंड, सबकॉन्सियस माइंड आणि  अनकॉन्सियस माइंड असं म्हंटले जाते.
काहीही समजून घेण्यासाठी आणि कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद किंवा उत्तर देण्यासाठी आपण आपल्या कॉन्शियस माईंड चा उपयोग करतो. आणि येथूनच गोष्टी समजून घेण्याची आणि कोणताही निर्णय घेण्याची योग्यता आपल्यात येते. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपले कॉन्शियस माईंड डेव्हलप होते.

तर दुसरे आहे सबकॉन्सियस माइंड जे आपल्या भावना आणि समज यांच्याशी संबंधित आहे. ज्याला आपण अंतःप्रेरणा किंवा मनाचा आवाज देखील म्हणतो. ते खूप लवकर डेव्हलप झालेले असते. म्हणून मुले लहानपणापासूनच भावनिक असतात, कारण त्या वयात त्यांचे कॉन्सियस माइंड विकसित  झालेले नसते.

म्हणून निर्णय घेण्याची योग्यता त्यांच्यात नसते. ज्या गोष्टी आपण बालपणात ऐकतो आणि आपल्या आई-वडिलांकडून शिकतो त्या सगळ्या गोष्टी  सबकॉन्सियस माइंड मध्ये साठवल्या जातात आणि मग आपण मोठे झाल्यानंतरही त्या गोष्टी आपल्या सबकॉन्सियस माइंड मध्ये तशाच राहतात. म्हणूनच आपण मोठे झालो तरी आपल्या आवडी-निवडींवर आपल्या पालकांच्या विचारांचा प्रभाव असतो.

तुम्हाला आठवतंय का, जेंव्हा तुमच्या वडिलांची नोकरी किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नसतो… आणि त्यामुळे तुम्हाला पैशाची कमरता भासू लागते, तेव्हा पैसे कमविणे किती कठीण आहे याबद्दल तुम्ही तुमच्या वडिलांना नेहमीच तक्रार करताना पाहीले असेल.

आणि पैशांच्या चणचनीमुळे ते त्यांचा राग घरातील इतर गोष्टींवर काढतं असतील. हो ना? कारण अशावेळी तुमच्या वडिलांना किंवा घरातील कमवत्या व्यक्तीला 'पैसे कसे मिळतील!' याचाच विचार करताना तुम्ही पाहिले असेल. बरोबर ना?

लहान असताना या सगळ्या गोष्टी तुमच्या सबकॉन्सियस माइंड मध्ये ॲड होतात आणि यामुळे ही गोष्ट आपल्या मनात कायम राहते की “पैसे मिळवणे फार अवघड आहे किंवा पैसे कमविण्यासाठी आपल्याला फार अडचणींचा सामना करावा लागतो आणि कदाचीत त्यामुळेच आपले वडील कधीच आपल्याबरोबर वेळ घालवू शकत नव्हते.”

आणि याच कारणामुळे मोठं झाल्यावर सुध्दा पैसे कमावणे तुम्हाला त्रासदायक वाटते किंवा पैसे  मिळवल्यानंतरही, आपल्याला नेहमीच असे वाटते की एवढे पुरेसे नाहीत. कदाचित तुमच्याकडे भरपूर पैसे ही असतील, पण लहानपणी कधी कधी आपल्याला एक चुकीची गोष्ट शिकवली जाते, की जास्त पैसे आल्यावर आपण आपल्या जवळच्या लोकांना गमावतो.

म्हणजे पैसा बाबत किंवा इतर कोणत्याही गोष्टी बाबत आपले जे काही मतं बनलेले असते, त्यात आपल्या सबकॉन्सियस माइंड चा हात असतो. पण काळजी करू नका ह्या बंधनातून सुटण्यास हे पुस्तक आपल्याला नक्कीच मदत करेल जेणेकरुन तुम्ही तुमचे जीवन मुक्तपणे जगू शकाल.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

Present as a Pigeon

कबूतर फक्त वास्तवात/ वर्तमानकाळात म्हणजेच प्रेजेंट मध्ये जगतो.  तो भूतकाळाचा विचार करून अस्वस्थ होत नाही, आणि येणाऱ्या भविष्यकाळाची ही चिंता करतं नाही. तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे फिरत राहतो.

जेव्हा त्याला पोटभर अन्न मिळते तेव्हा तो संतुष्ट, खुश होतो. पण आपण माणसे फक्त काळजी करत राहतो. आपल्या सर्वांच्या जीवनात काही ना काही ड्रामा चालूच असतो. आपल्याला असं वाटतं की  इतरांनी आपल्या इच्छे नुसारच वागावं.

आपण छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करायला लागतो. खरं पाहायला गेलं तर आपण आपल्या जीवनात होणाऱ्या चमत्कारांना पाहतच नाही, जीवनाचा आनंद ही घेत नाही.

असे मानले जाते की ही पृथ्वी एका काल्पनिक वर्तुळावर फिरत आहे.  इथे झाडे, हवा, पाणी सगळं काही आहे. आपण हसू शकतो, प्रेम करू शकतो, नवीन सूर बनवू शकतो. आपल्याकडे संगणक, कार, औषधे, केक अशा अनेक वस्तू आहेत.

हे संपूर्ण विश्व  लहान आणि मोठ्या चमत्कारांनी भरलेले आहे. येथे दररोज काहीं ना काही चमत्कार घडत असतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, आपण ते पहातही नाही आणि खरोखर ही एक दुःखाची बाब आहे.

आपण लहान मुलांकडून, जनावरांकडून, प्राणी, पक्ष्यांकडून शिकले पाहिजे की, कसे ते वास्तवात जगतात, कसे ते लहान सहान गोष्टींमध्ये आनंदित होतात.

जर तुम्ही कधी Observe केलं तर तुम्हाला हे दिसेल की जर एकद्या कुत्र्याचा मालक काही वेळा नंतर त्याच्या कुत्र्यासमोर आला तर तो कुत्रा त्याला पाहून आनंदाने उडी मारू लागतो. तो खूप उत्साहित होतो आणि त्याच्या त्या वागण्यातून कळते की, तो किती आनंदी आहे.

जर कुत्रे बोलू शकले असते, तर ते असे बोलले असते, “मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू माझ्यासोबत आहेस म्हणून मी खूप आनंदी आहे.”

लहान मुलं नेहमी वास्तवात/वर्तमानकाळात जगतात. नवीन गोष्टी शोधण्यात, शिकण्यात आणि मस्ती करण्यात त्यांना खूप आनंद मिळतो. लोकांना काय वाटते याची त्यांना पर्वा नसते. ते स्वत: ची तुलना इतर मुलांशी करत नाहीत, ते लहान मुल फक्त हसते, नाचते, गाणी गाते आणि उड्या मारत राहते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी एका खेळा सारख्या आहेत.

आणि ते या खेळाला फार इनजॉय करतात. त्यांच्यासाठी मस्ती आणि दंगा सगळ्यात महत्त्वाच्या   गोष्टी आहेत. आपण देखील खुश राहू शकतो, पण त्यासाठी आपल्याला फक्त प्रेसेंट मध्ये राहण्याची गरज आहे.

आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी या पृथ्वीतलावर उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, अटोमिक एनर्जी, मॅग्नेटची शक्ती या पृथ्वीवर आधीपासूनच अस्तिवात होती. पण तरीही आपल्याला त्या शक्तीला ओळखण्यासाठी आणि तिचा वापर लोकांच्या फायद्यासाठी करण्यासाठी निकोला टेस्ला सारख्या जिनियस ची गरज पडली.

म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आधीच येथे आहेत. आपल्याला फक्त त्यांना पाहण्याची दृष्टी असली पाहिजे, आपण ते कसे प्राप्त करू शकतो हे समजून घेणे आवश्यक आहे.

आता एका अशा मुलीची गोष्ट ऐका जिला “भगवान  श्रीकृष्णांना” पहाण्याची इच्छा होती. ती दाट जंगलात गेली, पूजा आणि ध्यान करण्यात मग्न झाली. काही काळाने श्रीकृष्णांनी तिला दर्शन दिले. ते तिच्या समोर उभे होते. त्यांनी तिला डोळे उघडण्यास सांगितले. पण ती म्हणली “महाशय कृपया माझे लक्ष विचलित करू नका, मी अत्यंत महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे”.

यातून आपल्याला काय शिकायला मिळेल? हेच की सध्याच्या क्षणामध्ये जगायला शिका. भूतकाळ आणि भविषयकाळाची चिंता करू नका. आता जे समोर आहे ते महत्त्वाचे आहे. सध्या घडणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेऊन, तो क्षण पूर्णपणे जगा. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्याकडे बघा. प्रत्येक गोष्टीसाठी आभारी राहा.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments