Why I Am an Atheist (Marathi)

Why I Am an Atheist (Marathi)

1930 मध्ये भगत सिंह हे लाहौरच्या जेलमध्ये होते.  त्यांनी तिथं एक निबंध लिहिला होता. ते स्वतःला एथीईस्ट म्हणजे नास्तिक मानत, नास्तिक म्हणजेच देवावर विश्वास नसणारे. आणि याच कारणामुळे त्यांचे मित्रं त्यांनां घमंडी समजू लागले होते.

त्यांचं मत होतं की भगत सिंग यांना खूप अहंकार आणि घमंड आहे, म्हणूनच ते स्वतःला नास्तिक म्हणतात. पण भगत सिंग यांना ही गोष्ट अगदी चूकीची वाटते. त्यांचे नास्तिक होण्यामागचे कारण त्यांचा अहंकार नाही, हे त्यांनी या निबंधात स्पष्ट केलंय.

या पुस्तकात तुम्हाला स्वातंत्र्या बदल असलेले त्यांचे विचार व तत्त्वांबद्दल माहिती मिळेल. त्यांनी जगात खूप अन्याय आणि अत्याचार पहिला, म्हणूनच त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जर देव अस्तित्त्वात आहे तर तो आपल्या माणसांना एवढं दुःख आणि त्रास का देतो?

या पुस्तकात त्यांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिचन लोकांच्या त्यांच्या देवाप्रती असलेल्या विश्वासाला चॅलेंज केले आहे. हे जग कसे तयार झाले, कशाप्रकारे त्यात प्रगती झाली आणि पुढील जन्माविषयीचा विचार यांसारख्या अनेक गोष्टींवर त्यांनी प्रश्न निर्माण केलेत. कारण ते पूर्ण आयुष्यभर नास्तिक बनून राहिले, स्वर्ग आणि पुढील जन्माच्या संकल्पनेवर त्यांना बिल्कुल विश्वास नव्हता.

भगत सिंग यांनी मोठ्या हिम्मतीने मृत्यूचा सामना केला, मृत्यूला ते घाबरले नाही. त्यांनी त्यांचे पूर्ण जीवन भारताला आणि भारतातील लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी घालवले. 1931 मध्ये त्यांना फाशी दिली गेली जेव्हा ते फक्त 23 वर्षांचे होते.

ते एक महान आणि थोर भारतीय नेते होते, तसेच ते अत्यंत हुशार असे लेखकही होते, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे त्यांचे मिशन होते, ज्यासाठी त्यांनी त्यांचा जीवही गमावला. ते नास्तिक असो वा नसो पण ते एक महान व्यक्ती नक्कीच होते, ज्यांचे जितके कौतूक करावे तितके कमीच आहे.

(Why I am an Atheist)
मी नास्तिक का आहे

मी गर्विष्ट आहे, हे मी नास्तिक असण्यामागचं, देवावर विश्वास नसण्यामागचं कारण आहे का, असे प्रश्न माझे मित्रं मला विचारतात. माझ्या वागण्यावरून त्यांना मी गर्विष्ट आहे असे वाटते याची मला कधी जाणीवच झाली नाही. काही जणांनी काही काळ माझ्यासोबत घालवला होता, त्यांना तर माझ्याबद्दल अशीच समजूत झाली. त्यामुळे मला आता या प्रश्नाचं उत्तर देणं भाग आहे.

मी स्वतःला एक साधारण व्यक्ती समजतो. कधीकधी मला देखील मी एक अहंकारी वाटतो, पण तो अहंकार किंवा गर्व हा माझ्या नास्तिक असण्यामुळे कधीच नसतो. काही मित्रं मला हुकूम चालवणारा म्हणतात.

तर काही म्हणतात की मी सगळी कामं माझ्या मर्जीने करतो. त्यांचं म्हणणं आहे की मी माझे मत दुसऱ्यांवर लादतो आणि जोपर्यंत ते ती गोष्ट मानत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याशी वाद घालतो. तर हो, या गोष्टीला मी नाकारू शकत नाही.

माझ्यामध्ये खूप ईगो आहे, ही गोष्ट देखील मी नाकारू शकत नाही, ज्याला आपल्या समाजात अहंकार किंवा स्वतःवर खूप गर्व आहे, असे म्हणतात. तर माझ्या गर्विष्टपणामुळे मी नास्तिक आहे, ही गोष्ट खरी असेल तर यामागे दोन कारणं असू शकतात:

पहिलं म्हणजे, माझा स्वतःवर एवढा विश्वास आहे की मी देवालाच माझा शत्रु समजतो. आणि दुसरं म्हणजे, मला एवढा गर्व आहे की मी स्वतःलाच देव समजतो.

पण जर पहिलं विधान खरं असेल आणि जर मी स्वतःला देवाचा शत्रु समजत असेल तर या परिस्थितीत मी नास्तिक असू शकत नाही, कारण मला स्वतः ला देवाचा शत्रु म्हणवून घेण्यासाठी मला आधी देवाचं अस्तित्त्व मान्य करावं लागेल म्हणजेच मला देव आहे आणि तो सर्वांना वरून पाहत आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा.

आणि जर, दुसरं विधान खरं असेल आणि मी  स्वतः ला देवाचा अवतार आहे असं म्हणत असेलो तरी देखील या गोष्टींचा हाच अर्थ  होतो की माझा देवावर विश्वास आहे. पण नाही, हे पूर्ण पणे चुकीचं आहे, कोणताही देव वगैरे आहे या गोष्टीवर मला विश्वास नाही.

मला फक्त हेच सांगायचं आहे की, मी या गोष्टी साठी गर्व  करत नाही किंवा मी स्वतःला देव वगैरे समजत नाही. देव किंवा कोणतीही दैवी शक्ती च्या अस्तित्वावर मला बिल्कुल विश्वास नाही.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

माझ्या मित्रांनी माझ्याबद्दल असा विचार का केला? त्यांना का असे वाटले की मी अहंकारी आहे म्हणून 'मी नास्तिक आहे'?

कोर्टात चालू असलेल्या ट्रायलमुळे मी खूप लोकप्रिय झालो आहे. दिल्लीमध्ये झालेल्या ब्लास्टमुळे आणि लाहौरमधल्या कांस्पीरेंसी केसमुळे लोकं मला ओळखू लागले. आणि माझ्या मित्रांना वाटले की ह्याच लोकप्रियते मुळे माझ्यात बदल झाले आहेत.

तर चला, मी तुम्हाला खरी गोष्टं सांगतो. मी अचानक किंवा आत्ता आत्ता नास्तिक नाही बनलोय. कॉलेजमध्ये असल्यापासून मी नास्तिक आहे. जे मला गर्विष्ठ म्हणतात त्यांना मी भेटलो देखील नाहीये आणि कॉलेजमध्ये असताना मी काय खूप चांगला विद्यार्थीही नव्हतो त्यामुळे मला स्वतःवर गर्व करण्याचा काही प्रश्नच येत नाही.

मी अभ्यासू आणि मेहनती होतो पण मी एक खूप लाजाळू मुलगा होतो, जो नेहमीच आपल्या भविष्याबाबत नकारात्मक विचार करायचा. पण हे देखील खरं आहे की, मी सुरूवातीपासून नास्तिक नव्हतो. माझे आजोबा आर्य समाजातील आहेत.

मीसुध्दा त्याच समाजांच्या विचार आणि विश्वासांमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. मी लाहौरच्या DAV शाळेत ऍडमिशन घेतले. पहिल्यावर्षी मी शाळेच्या बोर्डिंगमध्ये राहिलो. त्यावेळी मी सकाळ, संध्याकाळ देवाची प्रार्थना करायचो.

तास न् तास गायत्री मंत्र वाचायचो. देवाचा पक्का भक्त होतो मी. त्यानंतर मी माझ्या वडिलांसोबत राहायला लागलो. ते खूपच पुढील विचारांचे होते आणि नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत. स्वातंत्र्यासाठी लढायची प्रेरणा मला त्यांच्याकडूनच मिळाली. आणि माझे वडीलच मला रोज देवाची प्रार्थना करायला सांगायचे.

जेव्हा नॉन-कोऑपरेशन चळवळ मोठ्या तेजीने वाढत होती तेव्हा मी नेशनल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. जिथे माझे विचार अधिकच मुक्त झाले. खूपच बारकाईने मी विचार करू लागलो होतो. जुन्या काळापासून चालत आलेल्या विचारांवर आणि त्या पुर्ण व्यवस्थेवर मी प्रश्न उपस्थित करू लागलो. देवाशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टींवर मला प्रश्न पडायचे.

मी माझे केस वाढवले होते, प्रत्येक गोष्टीला मी विरोध करत होतो. जुन्या गोष्टी आणि धर्मांसंबंधित गोष्टीबद्दल मी वाईट विचार करू लागलो, त्यामध्ये दोष शोधू लागलो. पण तेव्हा माझा देवाच्या अस्तित्त्वावर विश्वास होता.

पण नंतर मी क्रांतीकारक पक्षाचा सदस्य बनलो. माझ्या लीडरला देवाच्या अस्तित्त्वावर शंका होती पण त्यांनी कधीच असे म्हटले नाही की देव अस्तित्त्वात नाही. मी त्यांना विचारायचो तर ते म्हणायचे की, प्रार्थना करायची असेल तर करा. पण मला वाटायचं की याप्रकारचे विचार हे अर्धे आहेत.

तर माझे दुसरे लीडर जे होते त्यांचा देवावर खूपच विश्वास होता. सचिन्द्रनाथ सन्याल, असं त्यांचं नाव होतं. त्यांना “कराची कांस्पेरन्सी” साठी शिक्षा सुनावली होती. त्यांनी “बंदी जीवन”  या नावाचं पुस्तकही लिहिलं, ज्यामध्ये त्यांनी देवाबद्दल अत्यंत चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत, देवाविषयी असलेला अतूट विश्वास त्यांनी त्यात दाखवला आहे.

मी हे सांगायचा प्रयत्न करत आहे की क्रांतीकारक पक्षात जे जे होते त्या सर्वांचा विचार हा नास्तिकाप्रमाणे नव्हता, सर्वांचे विचार वेगवेगळे होते. काकोरी कांडमध्ये ज्या चार लोकांना अटक केले होते त्या शहिदांनी त्यांच्या शेवटच्या क्षणी प्रार्थना केली होती. रामप्रसाद बिस्मिलसुध्दा आर्य समाजातून होते.

राजेन लाहिरीने त्याच्या मृत्यूपूर्वी गीता आणि उपनिषदमध्ये लिहिलेले श्लोक आणि भजन गायले होते. त्यांच्यात फक्त एकच असा होता ज्याने प्रार्थना केली नाही. त्यांचं म्हणणं होतं की आपण माणूसकीलाच नीट शकलो नाही. आपल्या या अज्ञानामुळे आणि दोषांमुळेच वेगवेगळे धर्म निर्माण झाले.

जेव्हा मी पहिल्यांदा पार्टी मध्ये सामील झालो तेव्हा मी एक मस्त खुल्या विचारांचा मुलगा होतो. जे माझे लिडर्स मला शिकवतील मी तेच फॉलो करायचो. पण त्या सर्वांच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी आमच्यावर म्हणजेच नवीन पिढीवर आली होती.

काही अशीही लोकं होती जी आमच्यावर हसायची, काहींना आमच्या जिद्दीवर आणि राजकीय पक्षाच्या ताकदीवर विश्वास नव्हता. याच गोष्टीने मला नवीन टर्न मिळाला, माझे विचार बदलून गेले. आणि 'शिका'  हे माझं नवीन घोषवाक्य तयार झालं. जर तुम्ही शिकलेले असाल तरच तुम्हाला दुसऱ्यांना उत्तर देता येतील आणि तेव्हाच तुम्ही क्रांतीकारी चळवळीच्या विचारांचा ह्रास थांबवू शकता.

आमच्या जुन्या नेत्यांनी फक्त ताकदीचा वापर केला. पण मला हे समजलं होतं की, विचार हे जास्तं ताकदवान असतात. शिक्षणामुळे आपल्याला ज्ञान मिळतं, जर आपण योग्य शिक्षण घेतले असेल तर आपण कोणत्याही ऐकलेल्या ऐऱ्या गैऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि एकंदरीत आपण अंधश्रद्धेतून बाहेर पडतो.

जेव्हा मी लीडर झालो. तेव्हा मी माझ्या इतर सदस्यांना सांगितले की, लोकांना आपल्या या लढ्याचं खरं महत्त्व समजणे जास्तं गरजेचे आहे. त्यांना आधी आपल्या लढ्यामागील कारण आणि तत्त्वे समजणे गरजेचे आहे.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments