Unlimited Power (Marathi)

Unlimited Power (Marathi)

परिचय

आपले लेखक टोनी रॉबिन्स चार दिवसांचे सेमिनार कंडक्ट (Conduct) करतात. ज्याचे नाव आहे 'माईंड रिव्हॉल्यूशन.' या सेमिनार मध्ये ते बऱ्याच ऍक्टिव्हिटी घेतात. त्यापैकी एक ऍक्टिव्हिटी आहे, फायर वॉक म्हणजेच आगीवरून चालणे.

विचारही करवत नाही ना? पण या ऍक्टिव्हिटी चा उद्देश हा आहे की आपल्या भीती वर वर्चस्व मिळवून तिला आपली ताकद बनवणे. या सेमिनार मध्ये भाग घेणारे लोक तब्बल 10 फुटांच्या ज्वाला सहन करत रखरखत्या कोळशा वरून अनवाणी पायाने चालतात.

आपले लेखक म्हणतात, “भीती ही आपल्या मनात असते.” त्यामुळे ते सेमिनार मधून लोकांना त्यांच्यात असलेल्या भीतीला काढून टाकण्यास शिकवतात. जर प्रयत्न केले, तर जगात काहीच अशक्य नाही यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि हाच विश्वास ते  लोकांच्या मनात निर्माण करू पाहतात. जर तुम्ही त्या रखरखत्या कोळशा वरून चालू शकतात, तर आयुष्यात कुठलेही संकट आले तरी तुम्ही त्याचा पाडाव कराल आणि हिंमतीने सामोरे जाल.

टोनी स्वतः एक निकामी व निराश होते. ते एकटेच राहत होते, नावडता जॉब त्यांना करावा लागत होता. तसेच त्यांचे वजन देखील खूप जास्त होते. पण फक्त 3 वर्षाच्या कालावधीत त्यांनी स्वतःचा कायापालट केला. हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतः ला  एक यशस्वी आणि आनंदी जीवन जगणारे व्यक्तिमत्व बनवले.

नावाजलेल्या लेखकासोबतच ते सगळ्यांचे आवडते मोटिव्हेशनल स्पीकर देखील बनले. त्यांनी बऱ्याच लोकांना मदत केली, जसं की Politicians, बिझनेस एक्सिक्यूटिव्ह, खेळाडू आणि अशी सामान्य माणसे जे स्वतः कुठल्या तरी भीती ने ग्रासलेले होते.

ते 25 वर्षांचे होईपर्यंत त्यांनी खूप यश मिळवले आणि ते श्रीमंत झाले. पत्नीच्या रुपात त्यांना अतिशय योग्य जोडीदार मिळाली. तसेच त्यांच्या करियर मध्ये ते अशा बऱ्याच लोकांना भेटले आहेत ज्यांनी टोनी यांना खूप प्रभावित केले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण टोनी यांच्याकडे कॉलेज ची कोणतीही डिग्री नाहीहे. त्यांनी फक्त 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तरीही त्यांना भरभरून यश मिळाले.

त्यांनी हे सगळं कसं साध्य केलं! याच सगळ्या गोष्टी टोनी आपल्याला या पुस्तकातून सांगतात. जेणेकरून तुम्ही त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्यांचे अनुकरण करू शकता.

या पुस्तकातून तुम्ही त्या अनमोल गोष्टींना शिकाल, ज्यांना टोनी आपल्या सेमिनार मध्ये सांगत असतात.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

द कमोडिटी ऑफ किंग

टोनी यांनी बऱ्याच यशस्वी लोकांना पाहिले आहे. त्यांनी जेव्हा सगळ्या गोष्टींना नीट Observe केले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्या सगळ्या लोकांच्या यशामागे एक कॉमन पॅटर्न आहे. टोनी त्या पॅटर्नला अलटीमेट सक्सेस फॉर्म्युला असं म्हणतात.

या मध्ये 4 स्टेप्स असतात. पहिली स्टेप आहे, आपले ध्येय ठरवणे म्हणजेच आपल्याला नेमक काय साध्य करायचे आहे हे ठरवणे. दुसरी स्टेप म्हणजे, कृती करणे आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे.

पण काही वेळेस काय होत की, पहिली स्टेप म्हणजेच  आपलं ध्येय ठरवण्यात जर आपण चुकलो की, दुसरी स्टेप म्हणजेच आपली कृती आपल्याला चुकीच्या वाटेवर घेऊन जाते. यासाठीचं तिसऱ्या स्टेप ची आवश्यकता असते, यात आपल्या कृतींचे Analysis करणे आणि त्यांचा फीडबॅक घेणे हे येते.

शेवटीची स्टेप आहे, “आपली वागणूक आपल्या ध्येयाला लक्षात घेऊन त्या अनुरूप करणे.” म्हणजेच आपल्या वागणुकीत तोपर्यंत बदल करत राहणे आणि सुधारणा करणे जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही. चला, हे एका गोष्टीतून समजुया:

स्टीव्हन स्पिलबर्ग यांना कोण ओळखत नाही बरं! अप्रतिम अशा अनिमेशनच्या मदतीने त्यांनी आपल्याला जुरासिक पार्क आणि डायनासौर चे जग दाखवले. ते अवघे 36 वर्षाचे असताना त्यांना एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली. इतिहासातील 10 उत्तम आणि ब्लॉक बस्टर movie चे ते दिग्दर्शक आहेत. त्यांच्या सर्वात यशस्वी movies मध्ये इ. टी, जुरासिक पार्क, इंडियाना जोन्स आणि शिंडलेर लिस्ट यांची गणना केली जाते.

तर स्पिलबर्ग यांनी त्यांच्या अशा अद्भूत करियर ची सुरुवात कशी केली बरं? ते सुरुवातीपासूनच एक गिफ्टेड दिग्दर्शक होते का? त्यांना काही विशेष अशी वागणूक किंवा फायदे मिळाले का? तर मुळीच नाही, असे अजिबात नव्हते.

त्यांनी तर फक्त अलटीमेट सक्सेस फॉर्म्युला वापरला आणि आज त्यांनी मिळवलेले यश आपल्या डोळ्यासमोर आहे. 'मी एक movie/चित्रपट दिग्दर्शक होऊ इच्छितो', हा एक विचार, ते teen age मध्ये असताना सतत त्याच्या मनात येत होता.

जेव्हा ते 17 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा युनिव्हर्सल स्टुडिओ पाहिला. युनिव्हर्सल स्टुडिओ फिरत असताना त्यांना साउंड स्टुडिओ दिसले. पण त्यांना तिकडे जाण्याची परवानगी नव्हती कारण तिकडे एका चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. तुम्हाला काय वाटते, की स्पिलबर्ग हे बघून तेथून निमूटपणे निघून गेले असतील?

अजिबात नाही, उलट ते धडपड करतं चित्रीकरणाच्या स्थळी पोहोचले आणि  त्या चित्रीकरणाचे बारकाईने निरीक्षण करू लागले. तेव्हा त्यांची भेट एका फिल्म एडिटर शी झाली आणि त्यांची चर्चा जवळपास 1 तास रंगली. स्पिलबर्ग यांनी एडिटर ला, त्या मूव्ही बद्दल सांगितले, जो मूव्ही ते बनवू इच्छित होते. त्यांच्यात विचारांना कृतीत उतरवण्याची ताकत आणि क्षमता होती.

त्यांनी एक प्लॅन बनवला आणि दुसऱ्याच दिवशी ते स्टुडिओ मध्ये येऊन बसले. या वेळेस मात्र ते सूट घालून तिथे पोहोचले. एवढेच नाही तर त्यांच्या सोबत त्यांनी वडिलांची ब्रिफकेस देखील घेतली. ते अगदी आत्मविश्वासाने सेक्युरिटी गार्ड च्या बाजूने गेले, त्यांचा थाट असा होता की जणू ते इथेच काम करतात.

पण त्या बिचाऱ्या सेक्युरिटी गार्ड ला तरी काय माहीत की ब्रीफकेस मध्ये महत्वाचे पेपर्स नव्हे तर सँडविच आणि 2 कँडी शिवाय काहीही नाहीहे. स्टुडिओ मध्ये गेल्यानंतर त्यांना एक रिकामा ट्रेलर मिळाला. तिथे ते बसले आणि त्यावर बोर्ड लावला ज्यावर लिहिले होते,'स्टिव्हन स्पिलबर्ग, डायरेक्टर'.

स्पिलबर्ग यांनी सगळा उन्हाळा असाच घालवला. ते स्टुडिओ मध्ये जात, तिथे दिग्दर्शक, लेखक, एडिटर यांना भेटत व त्यांच्याशी बोलत आणि ते सगळे फिल्म मेकर्स जे काही बोलत ते स्टिव्हन लक्षपूर्वक कान देऊन ऐकत आणि अगदी काळजीपूर्वक त्यांच्या कामाचे निरीक्षण करत. तिथे ते आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून भरपूर काही शिकले.

स्पिलबर्ग तीन वर्षे सलग स्टुडिओ मध्ये जात होते आणि शेवटी त्यांना एक काँट्रॅक्ट मिळाला ज्यात स्पिलबर्ग यांनी एक साधा चित्रपट बनवला आणि तो युनिव्हर्सल स्टुडिओ च्या कर्मचार्यांना दाखवला. तेथील लोकांनी त्यांच्या या टॅलेंट ला ओळखले आणि लगेचच त्यांना 7 वर्षांचा काँट्रॅक्ट दिला.

जेव्हा ते पहिल्यांदा टीव्ही शो चे दिग्दर्शक बनले, तेव्हा त्यांचे वय फक्त 20 होते. तर बघितल तुम्ही? कसं स्पिलबर्ग यांनी अलटीमेट सक्सेस चा फॉर्म्युला वापरला. त्यांनी पहिले दिग्दर्शक बनण्याचे ध्येय निश्चित केले आणि मग ऍक्शन घेतली. ते स्टुडिओ ला वारंवार जात राहिले आणि तेथील कर्मचाऱ्यांकडून अनेक गोष्टी शिकले.

जोपर्यंत तुमच्यात तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची इच्छा जागृत होत नाही तोपर्यंत ते स्वप्नच राहील, सत्यात उतणार नाही. जसं अब्दुल कलामांनीच म्हंटले आहे, स्वप्न ही झोपेत पडणारी नकोत, ती झोप न येऊ देणारी हवीत.

मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा फॉर्म्युला वापरू शकता. तुम्ही कोण आहात आणि तुमच्या कडे काय आहे, हे महत्वाचे नाही आणि याने काही एक फरक पडणार नाही.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments