Steve Jobs (Marathi)

Steve Jobs (Marathi)

परिचय

जेंव्हा वाल्टर आइजेकसना कळले कि स्टीव्ह जॉब्स कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत तेव्हा स्टीव्ह जॉब्सचे चरित्र लिहिण्याचे त्यांनी मान्य केले.

एक अतिशय आश्वासक आणि विचारशील असे स्टीव्ह जॉब्स 2004 पासून आइजेकसनला त्यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिण्यासाठी मनवत होते, पण  2009 मध्ये त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले जेंव्हा जॉब्स कर्करोगाचा सामना करताना दुसर्‍या मेडिकल लिववर होते.

सन 1984 पासूनच, टाईम्स मासिकामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आइजेकसनला बर्याच वेळा जॉब्स ला भेटायची संधी मिळाली. पण जेव्हा त्या महान इनोवेटर स्टीव्हने पहिल्यांदाच आइजेकसन ला स्वतः ची biography लिहायला सांगितली, त्यावेळी आइजेकसन अल्बर्ट आईन्स्टाईन वर लिहित होते आणि बेंजामिन फ्रँकलिन वरील त्यांचे पुस्तक पहिलाच famous झाले होते.

“जॉब्सना नुकतीच यशाचा मार्ग मिळत आहे आणि त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याची वेळ अजुन आली नाही” असे म्हणत जॉब्सचा प्रस्ताव आइजेकसन यांनी नाकारला. परंतु जॉब्जची पत्नी लॉरेन पॉवेल (Laurene Powell) यांनी त्यांना समजावले.

लॉरेन कडुन जॉब्सच्या आजाराबद्दल जाणून घेतल्यानंतर आइजेकसनने आपले विचार बदलले आणि शेवटी या कामासाठी ते तयार झाले. जॉब्सचे कर्करोगाचे ऑपरेशन होणार होते. असे असूनही ते शांततेत लढत होते.

आइजेकसनला प्रभावित करणारी आणखी एक गोष्ट ही होती की जॉब्जने त्यांना त्यांच्या स्वत: च्या पद्धतीने पुस्तक लिहिण्याची सुट दिली होती. त्यांनी लेखकाच्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही.

फ्रँकलिन आणि आइनस्टाईन प्रमाणे स्टीव्ह जॉब यांनीही विज्ञान आणि मानवता या दोघांच्या प्रगतीसाठी आपल्या क्षमतांचा अधिक चांगला वापर केला होता. इंजिनीअरिंग माइंड सोबत जॉब क्रिएटिव्ह पण होते.

ह्या एकत्रित गुणांमुळे एक महान इनोवेटर तयार होतात, जे ते स्वतः होते. जॉब्स आपल्या या गुणांमुळे पर्सनल कम्प्यूटरच्या जगात क्रांती घडवून आणू शकले. इतकेच नाही तर संगीत, डिजिटल प्रकाशन आणि अ‍ॅनिमेटेड चित्रपटांमध्येही त्यांच्यामुळे एक नवीन पर्व सुरू झाले.

जरी, त्यांचे वैयक्तिक जीवन किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त नसले तरीही ते त्यांच्या कामामुळे लोकांच्या जीवनावर नेहमीच प्रभाव टाकतील आणि सदैव एक प्रेरणास्रोत म्हणुन राहतील.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

बालपण

स्टीव्ह जॉब्स यांना लहान वयातच समजले होते की त्यांना दत्तक घेण्यात आले आहे. आणि ही गोष्ट त्यांचे वडील पॉल जॉब्स आणि आई क्लारा हागोपियन (Clara Hagopian) यांनी कधीही लपवली नाही.

जन्मापासूनच  या दोघांनीही स्टीव्हला वाढवले होते. स्टिव्ह ४ वर्षांचे असताना एकदा त्यांच्या शेजारच्या मुलीसोबत खेळत होते. तेव्हा त्यांनी तिला ते दत्तक घेतले गेले असल्याच सांगितलं.

ह्यावर ती मुलगी म्हणाली, म्हणजे तुझ्या खऱ्या आई वडिलांना तू आवडत नाहीस. म्हणूनच त्यांनी तुला सोडून दिलं.  हे ऐकून स्टीव्ह जॉब्स आपल्या घरी धावत गेले आणि आपल्या पालकांना ही गोष्ट सांगितली.

यावर त्यांचे आई-वडील स्टीव्ह जॉब्स यांना म्हणाले  “स्टीव्ह, आम्ही तुला निवडले कारण तू सर्वात विशेष आहेस, तू खास आहेस.” आणि कदाचित म्हणूनच स्टीव्ह एक आत्मनिर्भर आणि दृढ इच्छा व्यक्त करणारी व्यक्ती बनण्यास सक्षम झाले.

त्यांचे कार मेकॅनिक वडील त्यांचे पहिले हीरो होते. लहानपणापासूनच स्टीव्ह जॉब्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये खुपच interested होते. तरी ते कधीच अभ्यासात चांगले नव्हते. वर्गात बसणे बर्‍याचदा त्यांना कंटाळवाणे वाटत असे.

आपल्या कौशल्यांमुळे ते बऱ्याचदा काही ना काही त्रासदायक कृत्य करत असत. आणि हे ग्रेड स्कूल ते कॉलेज पर्यंत पुढे चालूच राहिले.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

वोजनिएक Wozniak

(Homestead high) होम्सस्टेड हाई येथे एका Common Friend द्वारे स्टीव्ह वोझ्नियाक आणि स्टीव्ह जॉब्स यांची भेट झाली. दोन्ही स्टीव्ह लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्स आणि मशीनंमध्ये खूप हुशार होते.

स्टीव्ह जॉब्सना आपल्या वडिलांप्रमाणेच एक बिझनेसमन व्हायचे होते, त्याच वेळी, स्टीव्ह वोजचे (Steve Woz) वडिल ज्यांना मार्केटींगची चिड होती, त्यांनी इंजीनियरिंगमध्ये काहीतरी चांगले करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली.

जॉब्जपेक्षा 5 वर्ष मोठे असूनही, वोज अत्यंत लाजाळू आणि जास्त अभ्यासु होते.  ते त्यांच्या कॉमन फ्रेंडच्या गॅरेजमध्ये जॉब्सला पहिल्यांदा भेटले. इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रचंड आवड असण्याबरोबरच बॉब डायलनच्या music नेही त्यांची जोडी जमवली होती.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

कालेज ड्राप आउट College drop-out

वोज्नियाकने बर्कली युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असताना जॉब्ज अजूनही स्वत: साठी कोणते कॉलेज निवडायचे याबद्दल confusion मध्ये होते. कारण स्टीव्ह जॉब्सच्या खऱ्या पालकांनी त्यांना ह्याच अटीवर दत्तक दिले होते की त्याचे शिक्षण पूर्ण होईल.

म्हणूनच त्यांच्या adoptive पालकांना महाविद्यालयीन फी भरण्यासठी खूप कष्ट करावे लागले. जॉब्सनी ठरवलं की ते जवळच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात जाणार नाहीत. त्यांना अशा ठिकाणी जायचे होते जे त्यापेक्षा कलात्मक आणि मनोरंजक असेल.

परंतु त्याच्या या निर्णयाला त्यांच्या पालकांची मान्यता मिळाली नाही, असे असूनही जॉब्सने पोर्टलँड ओरेगॉनच्या रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. फक्त एक हजार विद्यार्थी असलेले हे महाविद्यालय खूप महाग होते. आणि शिवाय ते त्यांच्या हिप्पी संस्कृतीसाठीही प्रसिद्ध होते.

रीड कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना थोड्या वेळानंतर जॉब्सला वाटले की त्यांनी निवडलेला कोर्स त्याच्या स्वप्नांच्या आड येत आहे. त्यांना ज्या गोष्टी शिकायच्या होत्या त्या गोष्टी ते शिकू शकत नव्हते.

आणि मग त्यांनी कॉलेज चे शिक्षण मध्येच सोडून दिले. आता जे त्यांना आवडेल  ते शिकायला त्यांनी सुरुवात केली. जसेकी कैलीग्राफी. रीड येथे अभ्यासाच्या वेळी त्यांना हिप्पी संस्कृती आवडू लागली होती.

जेन बुधिस्मवर त्यांनी शेकडो पुस्तके वाचली आणि शुद्ध शाकाहारी बनले. त्यांनी केस कापणे सोडले होते आणि संपूर्ण कॅम्पसमध्ये ते अनवाणी पायांनी फिरत असत.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

एप्पल I

स्टीव्ह वोजनिएक आणि स्टीव्ह जॉब्स यांनी विविध छोटे मोठे स्टार्टअप बिजनेस केले. जिथे वोजनिएक केवळ त्यांच्या बनवलेल्या डिझाईन्सची विक्री करण्यापर्यंत मर्यादित असताना जॉब्सना अशी काही उत्पादने तयार करायची होती जी unique असतील आणि त्यांच्यापासुन पैसे कमावता येऊ शकतील.

सर्वात पहिले, त्यांना एक नाव निश्चित करायचे होते. मेट्रिक्स सारखे टेक्नोलॉजिकल आणि पर्सनल कॉम्प्यूटर इंक सारख्यी काही कंटाळवाणी नावे त्यांच्या मनात येत होती, पण नंतर एप्पल हे नाव त्यांना interesting आणि काहितरी वेगळे वाटले.

हे नाव निवडण्याचे कारण केवळ जॉब्स एप्पलच्या फार्ममधुन फिरुन आले होते एवढेच नव्हतं, तर एप्पल कॉम्प्यूटर नाव ऐकायला सुद्धा खूप मजेदार आणि छान वाटत होते.
तोपर्यंत वोज HP (एच पी) साठी कार्यरत (or काम करत ) होते.

त्यांना तिथे स्वत: तयार केलेले सर्किट बोर्ड (circuit board) लावु वाटले. त्यांचा हा प्रोडक्ट नवीन होता. आणि यापूर्वी कधीही वापरलेला नव्हता, म्हणून तो नाकारला गेला. यामुळे निराश होऊन वोज यांनी पुन्हा तयार केलेली सर्व उत्पादने 100 टक्के केवळ एप्पलसाठी बनविली.

जॉब्सचा असा विश्वास होता की त्यांची टीम perfect होती कारण ते दोघे opposite होते. एकीकडे, वोज खूपच हुशार होते परंतु लोकांना भेटण्यापासुन लाजत असे, जॉब्स कोणाशीही सहज बोलू शकत असत आणि आपले काम पूर्ण करण्यात ते तज्ज्ञ होते.

एका कॉम्प्यूटर स्टोअरचा मालक, पॉल टेरेल त्यांचा पहिला ग्राहक बनला. त्याने त्यांच्याकडुन $500 per piece चे 50 सर्कीट बोर्ड मागितले. क्रेमर इलेक्ट्रॉनिक्सच्या  (Cramer Electronics) मेनेजरला विश्वासात घेउन त्याच्याकडून  $25,000 कर्ज घेतल्यानंतर जॉब्स, वोज त्यांची बहिण पैटी, आपली पहिली प्रेमिका एलिजाबेथ होम्स आणि एक मित्र डेनियल कोट्के यांना एकत्र घेऊन ते कामाला लागले.

आणि अशाप्रकारे लोस एल्टोस मध्ये जॉब्सच्या घरातल्या गॅरेजपासून एप्पलची सुरुवात झाली.

लीज़ा

पूर्ण 5 वर्षे जॉब्स ख्रिसेन ब्रेनन (Chrisann Brennan) बरोबर कधी हा कधी ना वाल्या नात्यात अडकुन राहिले. एप्पलची सुरुवात खूप यशस्वी झाली. जॉब्सनी आता त्यांच्या आईवडिलांचे घर सोडले होते आणि  कपरटीनो (Cupertino) मध्ये  $ 600  मध्ये भाड्याने घेतलेल्या घरात राहू लागले.

ब्रेनन आता त्यांच्या आयुष्यात परत आली होती. दोघेही आता एकत्र राहत होते. जेंव्हा दोघेही त्यांच्या वयाच्या 23 व्या वर्षात होते, तेंव्हा ब्रेनन जॉब्सच्या मुलाची आई होणार होती.

पण, जॉब्सचे संपूर्ण लक्ष केवळ त्यांच्या कंपनीकडे होते. त्यांना आपल्या कुटूंबाशी बांधून रहायची इच्छा नव्हती. आता त्यांच्यात आणि ब्रेननमध्ये वाद सुरू झाले. या मुलाचे आगमन त्यांच्या नात्यात अडचण निर्माण करत होते.

जॉब्संना लग्नाची कल्पनाही नव्हती आणि त्यांनी या मुलाचे वडील होण्यास नकार देखील दिला. हे सर्व असूनही ब्रेननने यांनी हार मानली नाही. त्यांचे काही मित्र या कठीण काळात त्यांच्याबरोबर राहिले आणि 17 मे 1978 रोजी ऑरेगॉन येथे त्यांनी लीजा निकोलला जन्म दिला.

आई आणि मूल मेनलो पार्कमधील एका छोट्या घरात राहू लागले. वेलफेयर मध्ये मिळणाऱ्या रकमेमध्ये ते राहत होते. जेव्हा लिसा एक वर्षाची होती तेव्हा जॉब्सला त्या दिवसांत डीएनए (DNA) टेस्ट करावी लागली ज्याचा परिणाम 94.41% स्टिव्ह हेच लीजा चे वडील आहेत असा होता.

हे सिद्ध झाल्यानंतर कॅलिफोर्नियाच्या कोर्टाने त्यांना लिसाच्या संगोपनासाठी monthly child support  देण्याचे आदेश दिले. जरी कोर्टाच्या आदेशानूसार, त्यांना जेंव्हा वाटेल तेव्हा त्यांच्या मुलीला भेटता येत होते पण अस असुनही ते कधिही तिला भेटायला गेले नाहीत.

1981

1977 मध्ये एप्पलने सुरूवातीच्या टप्प्यात 2,500 युनिट्सची विक्री केली आणि 1981 मध्ये त्यांची विक्री वाढुन 210,000 झाली होती. तरीही जॉब्सना हे चांगले ठाऊक होते की यशाची फेरी कायम टिकणार नाही.

म्हणुन त्यांनी एक नवीन प्रोडक्ट विचारात घेतले जे एप्पल – II पेक्षा चांगले असेल. त्यांना एक असे डिझाइन हवे होते जे पूर्णपणे त्यांचे स्वतःचे बनवलेले असेल. आपल्या मुलीशी असलेले नाते नाकारूनही त्यांनी आपल्या नवीन कंप्यूटरचे नाव लीजा ठेवले.

खरतर याला बनविणाऱ्या इंजीनियर्सनां याच्याशी मिळता जुळता एक्रोनिमचा विचार करावा लागला. लीजा चा अर्थ होता लोकल इंटीग्रेटेड सिस्टम आर्किटेक्चर (Local integerated system architecture).

एप्पलमधील 100,000 शेयर्सच्या बदल्यात Xerox PARC ने आपले नवीन तंत्रज्ञान जॉब्स आणि त्यांच्या प्रोग्रामर्सना विकले. काही भेटींनंतरच एप्पलचे इंजीनियर्सं Xerox कंप्यूटरचे माउस डिझाइन आणि इंटरफेस ची कॉपी करण्यात यशस्वी झाले. लीजाला पहिल्याहुन अधिक उत्कृष्ट ग्राफिक्स आणि स्मूथ स्क्रोलिंग माउस फीचरसह बाजारात उतरवण्यात आले.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

IPO

12 डिसेंबर 1980 रोजी प्रथमच एप्पलला जगासमोर आणण्यात आले. मॉर्गन स्टेनले IPO हाताळणार्‍या बँकांपैकी एक होती. एका रात्रीत , एप्पलची स्टॉक किंमत 22 डॉलर वरुन 29 डॉलरवर गेली. केवळ 25 वर्षांचे हिप्पी कॉलेज ड्रॉप-आउट स्टीव्ह जॉब आता करोडोचे मालक बनले होते. एवढे मोठे यश असूनही, त्यांनी देखाव्यापासून दूर साधे जीवन जगणे पसंत केले.

जॉब्स नी आपल्या आई-वडिलांच्या नावावर $750,000 किमतीचे एप्पल चे स्टोक केले होते ज्यामुळे त्यांना loans पासुन सुटकारा मिळाला. ते आता magazinesच्या कवर वर दिसू लागले होते.

ऑक्टोबर 1981 मध्ये Inc साठी त्यांनी पहिली कव्हर स्टोरी केली होती. त्यानंतर लगेचच, 1982 मध्ये ते टाईम्स मेगेज़ीनच्या कवरवर दिसले. त्याच्यात करोडपति होण्यासाठी 26 वर्षांच्या तरूणाने केलेल्या प्रवासाची एक कथा होती ज्याने त्याच्या पालकांच्या गॅरेजमधून 6 वर्षांपूर्वी आपली कंपनी सुरू केली होती.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments