Man’s Search for Meaning (Marathi)

Man’s Search for Meaning (Marathi)

परिचय

Jail हा शब्द ऐकून तुम्हाला आनंद होतो, की दुःख, की भिती वाटते? जे जग, आपण डोळ्याने पाहत आहोत, तेचं जग दृष्टी असणारा कैदी पाहू शकतो का?

ही गोष्ट एका कैदीच्या रोजच्या जीवनाबद्दलची आहे. 2nd वर्ल्ड वॉरच्या भयानक गोष्टींचा कोणताच खास उल्लेख यात केलेला नाही. आमची ही गोष्ट त्या एका साधारण माणसा बद्दल आहे ज्यानी स्वतःच सगळं काही गमवल होत. अगदी स्वतःची ओळख देखील.

ही गोष्ट कैदींच्या संघर्षाची आहे जे स्वतःची ओळख बनवण्याच्या प्रयत्नात होते, त्या हजारो दबून गेलेल्या आवाजाची, त्रासाबद्दलची आहे ज्याला Concentration camp मधील कैदी सहन करत होते. त्याव्यतिरिक्त ही गोष्ट त्या निनावी कैदींची आहे ज्यांचे अस्तित्व एका नंबर शिवाय दुसरे काहीच नव्हते. त्यांची ओळख आणि इज्जत काही असली तरी त्यांना 'sunwar' च्या नावाने बोलवले जात होते.

लेखक म्हणतात, आम्ही कोणी हिरो किंवा शहीद नव्हतो. आम्ही तुमच्या सारखेच हाडांचे आणि मांसाचे बनलेले माणसं होतो. अशी माणसं ज्यांना आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी गुलाम म्हणून, जे सांगीतले जाईल ते करावं लागतं होतं.

असं मानलं जात की, मानसशास्त्रचा अभ्यास करण्यासाठी कठोर व्हावे लागते. मी स्वतः Psychatrist असूनही मला असे वाटू लागले की, मला jail मधील त्या कठोर जगण्यामुळे मानसशास्त्र आणखीन जास्त कळायला लागले होते.

कोंसेंत्रेशन कॅम्प (Concentration camp) मधील कैदींची वेदनेनी भरलेली कथा कोणी बाहेरील व्यक्ती कधी समजूचं शकणार नाही. याला तिचं व्यक्ती समजू शकते, जिने त्या जगाला जवळून पाहिले आहे. मी या पुस्तकाला अनामिक मार्गाने प्रकाशित करणार होतो.

कारण मला आवडले नसते की, कोणालाही माझ्या कैदी नंबर व्यतिरिक्त इतर काही माहित व्हावे. पण नंतर मला समजले की, मला हिम्मत करून, पुढे होवून माझी ओळख जगाला सांगायला हवी. ज्यामुळे जास्तीत जास्त लोक हे पुस्तक वाचतील.

लेखक म्हणतात स्वातंत्र मिळण्याआधीच्या काही आठवडे आधी मी एक आजारी कैदी होतो. मी जास्तकरून रेल्वेलाईनचे काम करत असे. माझे काम ट्रॅक्सला खोदणे होते.  एक दिवस मी एक टनेल एकट्यानेच खोदले. ही १९४४ ची गोष्ट आहे, त्या वर्षी मला क्रिसमसला premium coupons मिळाले.

माझ्याकडे पूर्ण १२ coupons जमा झालते. त्याबदल्यात मी १२ सिगरेट किंवा १२ साबण घेऊ शकत होतो. आम्हाला बांधकाम फर्म मध्ये गुलामांसारखे विकले जात. ज्याच्या बदल्यात कोंसेंत्रेशन कॅम्पला फर्म कडून प्रत्येक कैदी नुसार पैसे दिले जात होते. आम्ही केवळ गुलाम होतो आणि मी केवळ नंबर  ११९,१०४ बनून राहिलो होतो.

फेज १: कॅम्प

अडमिशन कॅम्पमध्ये राहून मी कैदींच्या psychological reaction च्या ३ फेजेसला बारकाईने पाहिले आणि समजून घेतले. अगोदरचा फेज होता कॅम्प मध्ये एडमिशन, दुसरा रूटीन आणि तिसरा मुक्ति. जेव्हा कोणी कैदी कॅम्प मध्ये आणला जायचा, तेव्हा तेथील परिस्थिती पाहून त्याला मोठा धक्का बसत असे.

एके दिवशी आम्हा सगळ्यांना रेल्वेत कुठेतरी चालवले होते. आम्हाला रेल्वेत दाबून दाबून बसवले. केवळ वरच्याच भागात श्वास घेण्यासाठी थोडीशी जागा मोकळी होती. आमच्या ट्रेन मध्ये जवळजवळ 1500 कैदी होते.

आम्ही काही दिवस रेल्वेने प्रवास केला. आता आम्हाला वाटू लागले की, आम्हाला पोलंड मध्ये मजूरी करण्यासाठी घेऊन जात आहेत, पण जेव्हा आमची ट्रेन Auschwitz (औशविट्झ) वर येऊन थांबली तेंव्हा आम्ही घाबरलो.

औशविट्झचा अर्थ  स्मशानभूमी किंवा गॅस चेंबर्स असा होतो. मग, लवकरच आम्हाला वॉच टॉवर, काटेदार तारेची उंच भिंत आणि कैदीची लांबच लांब लाईन दिसली. आमच्या कॅरेजचे दरवाजे उघडले. युनिफॉर्म घातलेले काही कैदी आत आले. त्यांच्या डोक्याचे केस काढले होते आणि शरीराने ते strong वाटत होते. त्यांनी आम्हाला त्यांच्या मागे येण्यास सांगीतले.

आम्ही त्या लोकांच्या मागे गेलो आणि एका शेड मध्ये पोहचलो. जे खास कैदी आम्हाला त्यांच्या सोबत घेऊन गेले त्यांना capos म्हंटले जात होते. ते लोक कॅम्प मध्ये गार्ड सारखे काम करत. साधारण कैदी प्रमाणे त्यांना भुकेलेले, तहानलेले ठेवले जात नव्हते.

त्यांच्यात काही असे कैदी होते, जे इथे येऊन आधीच्या जीवनापेक्षा जास्त सुखी होते. हे सगळे capos खऱ्या गार्ड पेक्षा जास्त भयानक होते. प्रत्येक शेड मध्ये 200 कैदी ठेवले होते. इथे व्यवस्थित राहायला मिळो यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करत होतो.

आम्हाला आमचे सामान ट्रेनमध्ये सोडण्याचा आदेश मिळाला, समान ठेऊन आल्यावर आम्हाला लाईन मध्ये उभे राहण्यास सांगीतले. महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी लाईन बनवली होती. एका अधिकाऱ्याने आम्हा सगळ्यांची तपासणी केली. तो आम्हाला हाताने लेफ्ट किंव्हा राईटला जायला सांगत होता.

आमच्यातले जास्त लेफ्टला पाठवले गेले. त्या एका व्यक्तीच्या हाताच्या संकेताने आमच्या जीवनाचा निर्णय घेतला होता. मला कोणीतरी कानात सांगितले, ज्यांना राईट ला पाठवले आहे त्यांच्याकडून काम करून घेतलं जाईल आणि जे लेफ्टला पाठवले आहेत ते आजारी आणि कोणत्याही कामास योग्य नसलेले आहेत.

जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे तंदुरूस्त दाखवण्याचा प्रयत्न केला. माझ्या समोरील माणसाने मला राईटला जाण्यास सांगितले. लेफ्टचा अर्थ होता “मृत्यू” आणि आमच्यातील ९०% लोकांच्या नशिबाचा निर्णय हाच होता.

पुढे लेखक म्हणतात, काही तासातच आम्हाला स्टेशनहून crematorium (स्मशानभूमी) मध्ये घेऊन गेले. जिथे एक मोठी इमारत होती. त्या इमारतीला मोठमोठे दरवाजे होते. आशाच एका मोठ्या दरवाज्यावर वेगवेगळ्या युरोपियन भाषेत “Bath” लिहिलं होत.

प्रत्येक कैदीला एक छोटासा साबण दिला गेलता. माझ्या एका साथीदाराला लेफ्टला जायला सांगितले होते. जेव्हा मी एका दुसऱ्या कैदिला माझ्या साथीदाराबद्दल विचारले, तेव्हा तो कैदी चिमणीकडे हाथ दाखवत म्हणाला “तुझा मित्र तिथून स्वर्गाच्या प्रवासाला लागला असेल.

त्याचं रात्री मला कळाले की इथे exactly काय चालू आहे.  हो, माझा मित्र खरच स्वर्गात गेला होता कारण जर्मनसने त्याला गॅस चेंबर मध्ये जिवंत जाळले होते. जे लोक कमजोर होते त्यांना कॅम्पचे ओझं समजल गेलं, म्हणून त्यांच्या नशिबात मृत्यू लिहिला गेला.

तेथील लोकांच्या जीवनातील उद्येश्य हाच होता की, कैदीना गुलाम बनवणे आणि त्यांच्या कडून हवं असलेले काम करून घेणे. जे कैदी कमजोर होतात त्यांना जिवंत मारले जात. तिथे माणूस हा केवळ एखाद्या वस्तु प्रमाणे वापरला जात होता. म्हणूनच तिथे माणसाच्या जीवनाची किंमत नव्हती.

आमच्यातील जी लोक राईटला आली होती, त्यांना गार्डस सोबत कामावर नेले. आम्हाला cleansing स्टेशनकडे पळायला लावले. आम्ही कॅम्पच्या चारी बाजूंनी लागलेल्या काटेदार तारे पासून गेलो. या काट्यांच्या तारेत लाईटचा करंट होता. नंतर गार्डने आम्हा सगळ्यांना एक एक करून टेस्ट केले.

त्यांचे लक्ष आमच्या दागिन्यांवर होते. काही लोकांनी (कैदिनी) आपले मेडल्स जे त्यांना आधीच्या जेल मध्ये मिळाली होती, किंवा लग्नाच्या अंगठी स्वतः कडेच ठेवण्याची विनंती केली होती. पण कोणालाच आपल्याकडे काहीही ठेवण्याची परवानगी मिळाली नाही.

नंतर, एका गार्डने ओरडुन 2 मिनिटात सगळ्यांना कपडे काढण्यास सांगीतले. ज्यांनी बेल्ट काढला नव्हता, त्यांच्यावर गार्ड मोठ्याने ओरडत होते.

आम्हाला एका खोली मध्ये नेऊन शेव केले. हो, फक्त चेहऱ्यावरचं नाही, तर आमच्या शरीरावर एकही केस  ठेवला नाही. आम्ही स्वतःलाच ओळखू शकत नव्हतो. त्यानंतर आम्ही अंघोळीसाठी पुन्हा लाईन मध्ये लागलो.

आम्ही सगळे स्वतःला पूर्ण नग्न झालेलो पाहत होतो. आमच्याकडे याशिवाय दुसरा कोणता मार्गही नव्हता. आमची कोणतीच गोष्ट आमच्याकडे नव्हती. स्वतःला लपवण्यासाठी शरीरावर केसही नव्हते. आम्ही तसेच उभे होतो. 'आता पुढे काय होणार” हा विचार करत.' ( Or 'आता पुढे काय होणार” हा विचार करत' आम्ही तसेच उभे होतो. )

SHARE
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments