Total Recall: My Unbelievably True Life Story (Marathi)

Total Recall: My Unbelievably True Life Story (Marathi)

परिचय (Introduction)

तुम्हाला अर्नोल्ड श्वार्झनेगर  (Arnold Schwarzenegger) बद्दल काय माहित आहे? केवळ इतकेच ना की, ते टर्मिनेटर सारख्या चित्रपटांचे स्टार होते आणि ते हॉलीवूडचे एक फेमस एक्टर आहेत, हो ना? अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म ऑस्ट्रियामध्ये झाला आणि ते तिथंच लहानाचे मोठे झाले,  मूवी स्टार बनण्यापूर्वी ते एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर होते.

मित्रांनो या पुस्तकात तुम्हाला अर्नोल्ड श्वार्झनेगरच्या अनेक सीक्रेट्सची माहिती मिळेल. जसेकी ते मल्टी-अवॉर्ड बॉडी बिल्डर, भरपुर कमाई करणारे एक्टर आणि नंतर टू टर्म गव्हर्नर कसे झाले? कसे एका माणसाने आपल्या आयुष्यात इतक्या गोष्टी अचिव केल्या वगैरे वगैरे..अर्नोल्ड श्वार्झनेगरची लाइफ टर्मिनेटरच्या हिरोपेक्षा खुप जास्त मोठी आहे.

ते एक दृढ निश्चयी आणि एक डेडीकेटेड फेमिली मॅन आहेत. या पुस्तकात, तुम्हाला अर्नोल्ड श्वार्झनेगर यांची एक्शन-पॅक लाइफ स्टोरी वाचायला मिळेल, मला विश्र्वास आहे की, ती वाचल्यानंतर तुम्ही खुप प्रेरित व्हाल.

आउट ऑफ़ ऑस्ट्रिया (Out of Austria)

माझा जन्म 1947 मध्ये ऑस्ट्रियात झाला. हा तोच काळ, जेव्हा हिटलर महायुद्धात हारला होता. 'सोव्हिएत युनियन आमच्यावर हल्ला तर करणार नाही ना', याची आम्हाला फार भीती होती. बर्‍याच वर्षांपासून देशात तीव्र भूकमारी पसरली होती.

मला व माझ्या मोठ्या भावाला वाढविण्यासाठी माझ्या आईवडिलांना फार संघर्ष करावा लागला. आम्ही अशा खेड्यात राहत होतो जिथं बरीच शेती होती. माझे वडील पोलिस आणि आई ग्रुहिणी होती. माझा भाऊ मेंहार्ड माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा आहे.

आमच्या घरात दोन बेडरूम आणि एक लहान स्वयंपाकघर होते जिथे आम्ही जेवायचो, अभ्यास करायचो आणि तिथे साफसफाईची कामेही करायचो. माझी आई घराची चांगली काळजी घेत असे. ती आमच्यासाठी गावोगावी फिरुन धान्य, साखर आणि बटर इत्यादी गोळा करायची. माझे वडील एक मस्क्यूलर बॉडी असलेले उंच मनुष्य होते.

मी आणि माझा भाऊ अनेकदा त्यांना घराबाहेर कोळसा गोळा करण्यास मदत करायचो, कारण हिवाळ्यापूर्वी आम्हाला बराच कोळसा गोळा करावा लागायचा. माझा जन्म शीत युद्धाच्या(cold war) वेळी झाला होता. त्यावेळी माझ्या देशातील अनेक लोकांना अमेरिकेत जायचे होते.

बऱ्याचदा मी आणि माझा मोठा भाऊ movie पाहण्यासाठी शहरात जायचो. मला आठवते टार्झन हा आम्ही पाहिलेला पहिला movie होता. आम्हाला हा movie इतका आवडला की, आम्ही तो पुन्हा अनेकदा पाहिला. टार्झनला एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे झुलताना आणि प्राण्यांशी बोलताना पाहुन आम्हाला खुप आश्चर्य वाटायचे.

मी जेव्हा दहा वर्षांचा होतो तेव्हा तलावाच्या काठावर आईस्क्रीम विकायला जायचो. बरेच लोक तिथे येऊन आईस्क्रीम घेत असत. एक दिवस मी 1 शिलिंगमध्ये एक डझन आईस्क्रीम पॉप विकत घेतले आणि मग त्यांना घेऊन तलावाकडे गेलो.

तेथे मी प्रत्येकी 3 शिलिंग नुसार सर्व पॉप विकले. लेक पार्क हे फिरण्यासाठी एक चांगले ठिकाण होते. लोक तिथे विश्रांतीसाठी, खेळण्यासाठी किंवा पोहण्यासाठी यायचे. हळूहळू माझा आईस्क्रीम व्यवसाय जोरात चालू लागला, नंतर मी आइस्क्रीमला थंड ठेवण्यासाठी एक कूलरही घेतले. मी दररोज 150 शिलिंग म्हणजे $6 पर्यंत कमवत होतो.

आईस्क्रीम विकल्यानंतर माझा भाऊ आणि मी movie पाहायला जायचो. फक्त वयाच्या दहाव्या वर्षी मला समजले होते की, मला काहीतरी मोठे करायचे आहे. मी लहानपणापासूनच अमेरिकेचे स्वप्न पाहायला लागलो. मी ज्यांना पण भेटायचो त्यांना म्हणायचो, “एक दिवस मी नक्की अमेरिकेत जाईन.” मी हे माझ्या कुटुंबियांना, शेजार्‍यांना आणि शिक्षकांना देखील सांगितले होते.

एके दिवशी बसस्टोपवर माझ्यापेक्षा वयाने थोडी मोठी मुलगी बसची वाट पाहात होती. मी तिला पाहताच म्हणालो “एक दिवस मी अमेरिकेला जाईन”, तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, “हो, हो अर्नोल्ड, तू नक्कीच अमेरिकेला जाशील” आणि मी खरोखर अमेरिकेला गेलो. माझे स्वप्न पुर्ण झाले आणि हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद होता.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

बिल्डिंग अ बॉडी (Building a Body)

आमच्या इतिहासाच्या शिक्षिका आम्हाला न्यूज पेपरमधील आर्टिकल देत आणि त्यावर आम्हाला रिव्ह्यू लिहिण्यास सांगत. एक दिवस मला newspaper मधील स्पोर्ट्स section वर रिव्ह्यू लिहण्यास सांगीतले. त्यावेळी मी पहिल्यांदा त्यात मिस्टर वर्ल्डचा फोटो पहिला. त्याचे नाव होते कर्ट मर्नुल. त्याने 190 किलोग्राम बेंच प्रेस मध्ये रेकार्ड बनवला होता. त्याचा फोटो पाहून मी खुप इम्प्रेस झालो होतो.

लेक पार्कमधील लाइफगार्ड विलीशी माझी मैत्री झाली होती. मी त्याला दररोज पुश अप करताना पाहायचो. एक दिवस त्याने मला विचारले “तु सुद्धा प्रयत्न करणार का?” विली ची बर्याच बॉडीबिल्डर्स आणि वेट लिफ्टर्स सोबत मैत्री होती. सुरुवातीला बॉडी बिल्डिंग हा माझ्यासाठी एक खेळ होता परंतु जेव्हा माझा त्यात इंटरेस्ट वाढत गेला तेव्हा मी सिरियस होत गेलो.

मी विली आणि त्याच्या मित्रांसह व्हिएन्नाला गेलो, जिथे वर्ल्ड वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप होती. तिथे मी मिस्टर वर्ल्ड, कर्टला पाहिले. त्याचे आश्चर्यकारक शरीर पाहून मी खूप प्रभावित झालो. नंतर जेव्हा मी मिस्टर हरक्यूलिस आणि कॅप्टिव्ह वुमनला बघितले तेव्हा मी आणखीनच  इंस्पायर झालो.

विली खरंतर कर्ट मर्नुलचा मित्र होता. एके दिवशी त्याने मला सांगितले की, मिस्टर वर्ल्ड स्वत: लेक जवळ फिरायला आले आहेत. माझ्यासाठी त्यांना वैयक्तिकरित्या भेटण्याची हीच संधी होती. मग मी त्यांना भेटलो ही.  मला त्यांना भेटून फार आनंद झाला.

त्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षापासूनच मी जिममध्ये फॉर्मल ट्रेनिंग घेणे सुरू केले. आता मी माझ्यापेक्षा मोठ्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवू लागलो, हे लोक माझे गुरू होते. ते नेहमी ज्युनियर मुलांना प्रशिक्षण द्यायचे.

आम्ही बॉडी बिल्डिंगची मैगजींस वाचायचो ज्यातून आम्हाला ट्रेनिंग कसे करायचे, काय खायचे आणि कसे मसल्स बिल्ड करायचे हे समजायला लागलं. मला अमेरिकन मैगजीन्स खूप आवडायची. त्यात बॉडीबिल्डर्सची चित्रे लावलेली असत.

हे बॉडी बिल्डर्स त्यांच्या अमेजिंग बॉडीबरोबर मसल्स फ्लेक्स करताना सिग्नेचर पोझेस द्यायचे. आणखी एक गोष्ट मला फेसिनेट करायची आणि ती म्हणजे त्यांच्याभोवती नेहमीच सुंदर मॉडेल्स असायच्या. मी मैगजींसमधील हरक्यूलिस रेग पार्कच्या जीवनाविषयी वाचले होते. तो इंग्लंडचा होता आणि अत्यंत गरीब कुटुंबातील होता.

पण तो बॉडी बिल्डिंगमध्ये आला आणि त्याने बरीच मेहनत केली. नंतर तो मिस्टर युनिव्हर्स झाला. तो इतका प्रसिद्ध झाला की त्याला  Hercules या movie मध्ये Herculesची भूमिका मिळाली. तो आता मिलेनियर आहे आणि आपल्या सुंदर पत्नीसोबत रोममध्ये राहतो. वयाच्या 15 व्या वर्षापासून मी देखील असेच काहीतरी स्वप्न पाहु लागलो.

मला खात्री होती की, बॉडी बिल्डिंगच एक दिवस मला अमेरिकेत घेऊन जाईल. पहिले मी मिस्टर युनिव्हर्सचे ट्रेनिंग घेईन आणि मग मी रेग पार्क सारखा फिल्म स्टार बनून अमेरिकेला जाईल. माझे ध्येय अगदी स्पष्ट होते. आणि म्हणूनच माझ्यात फोकस आणि डेडीकेशनची फीलिंग तयार झाली होती. मला काय करायचे हे माहित होते. म्हणूनच मी मनापासून माझ्या स्वप्नांच्या मागे लागलो.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments