The Go-Giver (Marathi)

The Go-Giver (Marathi)

इंट्रोडक्शन (Introduction)

मित्रांनो, या पुस्तकात तुम्ही स्ट्रॅटोस्फेरिक सक्सेसचे 5 लॉज़ जाणून घेणार आहात. स्ट्रॅटोस्फेरिक सक्सेसचा अर्थ अशी सक्सेस जी तुमच्या कल्पनेपेक्षा खुप मोठी असते. तुम्ही “गिविंग” म्हणजेच देण्याचे महत्त्व जाणून घ्याल.

तुम्ही अशा लोकांच्या यशोगाथांबद्दल शिकणार आहात ज्यांनी स्वतःसाठी काही करण्याऐवजी इतरांसाठी काहीतरी करायचे  ठरवले आणि आज ते त्या यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत जिथे त्यांना पोहचायचे होते. त्यांनी केवळ स्वतःचा विचार केला नाही, तर इतरांना काहीतरी देण्याचा विचार केला.

हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नाही ना? मग स्वतःच पहा. या पुस्तकाला एक संधी द्या आणि यातून ते ज्ञान मिळवा जे तुम्हाला गगनभरारी घ्यायला मदत करेल.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

द गो- गेटर  (The Go-Getter)

“जो” एक गो गेटर आहे. गो गेटर म्हणजे असा माणूस जो त्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी खूप महत्वाकांक्षी (एम्बिशियस) असतो.

जो अगोदर स्वत: चा विचार करतो, जसे, हे काम केल्याने मला काय मिळेल, यात माझा काय फायदा आहे? तो काही मागण्यास अजिबात संकोच करत नाही. “जो” ला टॉपवर पोहचायचे होते. आपल्या फर्ममध्ये 1 नंबर  आणि बेस्ट एजंट होण्यासाठी तो कठोर मेहनत करत होता. इतक सगळ करुनही तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नव्हता.

त्याला पहिल्या आणि दुसर्‍या महिन्यात त्याचे टारगेट पूर्ण करताच आले नाही. आता तिसरा महिना देखील संपणार होता, पण तो अजूनही खूपच मागे होता. म्हणून तो मदत मागण्यासाठी एका विख्यात सल्लागार “पिंडार” यांच्याकडे गेला.

पिंडार यांना प्रेमाने सगळे चेयरमॅन म्हणून हाक मारायचे. सल्लागार असण्याव्यतिरिक्त ते एक गुरू किंवा मार्गदर्शक आणि कीनोट वक्ते देखील होते. बिजनेसच्या क्षेत्रात त्यांनी खुप यश आणि पैसा मिळवला होता, ज्यामुळे ते एक बिझनेस टायकून देखील होते.

ते आपल्या बिजनेसमधुन रिटायर झाले होते, आता ते सगळं लक्ष इतर कंपन्या आणि व्यावसायिकांना मदत करण्यावर आणि त्यांना यशस्वी करण्यात केंद्रित करीत होते. जो पिंडारला भेटून खूप प्रभावित झाला. त्याला वाटले की पिंडार खरोखरच स्तुती करण्यायोग्य आहेत.

जो ने पिंडार ला त्यांच्या यशाचे रहस्य विचारले. पिंडार फक्त एकच शब्द म्हणाले, “गिविंग” म्हणजे देणे. जो ला हे फार विचित्र वाटले, त्याचा यावर विश्वासच बसत नव्हता. कारण लोक अशा जगाच्या आधिन झाले आहेत जिथे जीवनाच्या शर्यतीत पुढे जाण्यासाठी एकाने दुसर्‍यास चिरडून, दुःख पोहोचवून पुढे जायचे असते.

इथे प्रत्येक माणूस केवळ स्वतःचा च विचार करतो. जो विचार करू लागला, आपण नेहमीच देत राहिलो तर स्वत: चा फायदा कसा होइल? पिंडारनी जो ला एका रोमांचक प्रवासासाठी आमंत्रित केले. यात ते स्ट्रॅटोस्फेरिक सक्सेसच्या 5 लॉजचे रहस्य सांगणार होते.

हा रोमांचक प्रवास दुपारच्या लंच चा होता. एक दिवस नाही तर येणाऱ्या आठवड्यातील पाच दिवस 'जो' ला लंचसाठी पिंडार यांना भेटायचे होते. आणि पिंडार दररोज त्यांच्या एका एका मित्राची ओळख जो शी करून देणार होते.

जेणेकरुन 'जो' ला सगळे लॉज एक-एक करून शिकता येतील. पण पिंडार यांची एक अट होती की 'जो' जो law शिकेल त्याला तो लॉ त्याच दिवशी अप्लाई करावा लागणार होता. लंचपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत 'जो' ला तो law खऱ्या आयुष्यात अप्लाई करून टेस्ट करायचा होता.  कारण 'जो' ला आठवड्याच्या शेवटी हे law किती Powerful आहेत, याचे analysis करायचे होते.

'जो' सोमवारी एका रेस्टॉरंटच्या मालकास भेटला, त्याचे नाव अर्नेस्टो होते. मंगळवारी त्याने निकोल नावाच्या एका सीईओची भेट घेतली. बुधवारी तो सॅम नावाच्या आर्थिक सल्लागाराला (Economic advisor) भेटला. डेबरा या रिअल इस्टेट एजंटला त्याने गुरुवारी भेट दिली. शुक्रवारी 5 व्या लॉ चे रहस्य एका अशा व्यक्तीने उघडले ज्याची त्याने कधीच अपेक्षा केली नव्हती.

तर येणाऱ्या चॅप्टर्समध्ये तुम्ही प्रत्येक लॉ बद्दल जाणून घ्याल. तूम्ही अर्नेस्टो, निकोल, सॅम आणि डेबराच्या सक्सेस स्टोरीज शिकू शकाल. आणि  हे देखील पाहणार आहात की 'जो' ची कथा कोणत्या टप्प्यावर  संपते.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

द लॉ ऑफ़ वैल्यू  (The Law of Value)

“द लॉ ऑफ़ वॅल्यू” म्हणजे तुमची खरी किंमत काय आहे आणि ती खरी किंमत कशावर अवलंबून असते. तर तुमची खरी किंमत, तुम्ही लोकांना त्यांच्या पैशाच्या बदल्यात किती वॅल्यू प्रोवाइड करता यावर अवलंबून असते. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही तुमच्या सर्व्हिस मध्ये अधिक वॅल्यू ऍड करुन, आहे त्या किंमतीलाचं ग्राहकांना दिल्यास, तुम्ही लवकर सक्सेसफुल व्हाल.

Value add करणे म्हणजे ग्राहकाला असा अनुभव देणे जो त्याला कायम आठवणीत राहील. “वा! किती मस्त आहे” असं म्हणणं ग्राहकाला भाग पाडा. तुम्ही जितकी जास्त वॅल्यू ऍड कराल, तितके जास्त यशस्वी व्हाल.

'अर्नेस्टो आइफ्रेट' हे एका रिअल इस्टेट बिझिनेसचे टायकून आहेत. ते एक उत्तम शेफ, शिवाय एका रेस्टॉरंटचे मालकही आहेत. जवळपास वीस वर्षांपूर्वी, अर्नेस्टोकडे फक्त एक हॉट डॉगचे स्टँड होते.

काही वेळातच त्यांना असे कस्टमर्स मिळाले जे नेहमी त्यांच्या स्टँडवर येऊ लागले. ही गोष्ट सगळीकडे पसरू लागली. आता अशी परिस्थिती निर्माण झाली होती की शहरातील मोठ-मोठे बिझनेस executive देखील दुपारच्या जेवणासाठी अर्नेस्टोंच्या स्टँडवर येऊ लागले.

त्यांना अर्नेस्टो यांचा हॉट डॉग इतका आवडायला लागला की काही बिझनेस executives ने अर्नेस्टोंकच्या हॉट डॉग स्टँड मध्ये काही पैसे मदत म्हणून इन्वेस्ट केले. जेणेकरुन ते एक रेस्टॉरंट उघडु शकतील.

अर्नेस्टोंच्या स्टॉलवर नेहमीच लोकांची गर्दी असायची. त्यांचे इतके कस्टमर्स झाले होते की, जेव्हा त्यांनी रेस्टॉरंट सुरू केले तेव्हा आधीच्या हॉट डॉग स्टॉल प्रमाणेच त्यांनी त्यांच्या कस्टर्मर्सला जेवणाचा उत्तम अनुभव दिला. जे इतर रेस्टॉरंट्स देऊ शकत नव्हते. असे करून त्यांनी भरपुर प्रॉफिट कमावला.

अर्नेस्टो यांनी ते रेस्टॉरंट विकत घेतले. त्या executives नेही हे आनंदाने स्वीकारले कारण त्यांनाही याचा मोठा फायदा झाला होता. या यशानंतर, अर्नेस्टोंनी त्या शहरात आणखी बरेच रेस्टॉरंट्स उघडले.

या व्यतिरिक्त त्यांनी काही कमर्शियल प्रॉपर्टी मध्ये पैसे गुंतविण्याचा विचार केला. कमर्शियल प्रॉपर्टी म्हणजे रिअल इस्टेट प्रॉपर्टी जिथे जास्त करून बिज़नेस एक्टिविटीज होतात आणि ज्यामधून बराच प्रॉफिट मिळवता येतो. अशा प्रकारे ते रिअल इस्टेटच्या जगाचे टायकून बनले.

अर्नेस्टो यांच्या यशाचे रहस्य नेमक काय आहे? त्या शहरात दुसरे रेस्टॉरंट्स आणि हॉट डॉग स्टैंड्स नव्हते का? त्यांचेही जेवण खूप चवदार आणि रुचकर आहेच ना! तर मग असं काय होतं, ज्याने अर्नेस्टो यांचे रेस्टॉरंट् इतके लोकप्रिय बनवले?

तर चला पाहूया, त्यांच्या यशा मागचे रहस्य. ते त्यांच्या Custmer ला जी service provide करतं, ती  जास्त वॅल्यु ऍड करून देत. अर्नेस्टोंच्या हॉट डॉग स्टँडचे सुरुवातीचे कस्टमर्स लहान मुले होती. ते त्या मुलांची नावे आणि वाढदिवस लक्षात ठेवायचे. ते त्यांचे आवडते रंग, कार्टून कॅरेक्टर्स यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचे.

अर्नेस्टो मुलांना फार आवडायचे. ते त्या मुलांशी खुप वेळ बोलायचे आणि त्यांना ट्रीटही द्यायचे. मुले त्यांना चांगलंच ओळखू लागली होती. मुले त्यांच्यावर विश्वास ठेवू लागली होती. आणि हळू हळू ती मुलं त्यांच्या पालकांनाही त्या स्टँडवर घेऊन जाऊ लागली.

अर्नेस्टो आता मोठ्यांची देखील नावे, वाढदिवस आणि त्यांच्या आवडी-नावडी लक्षात ठेवू लागले. आता ह्या पालकांनाही अर्नेस्टोंची चांगली ओळख झाली. अर्नेस्टो त्यांच्याशी असे वागायचे की जणू ते खुप जुने मित्र आहेत किंवा त्यांचे खुप घनिष्ट नातेसंबंध आहेत, यामुळे लोकांना पुन्हा-पुन्हा त्यांच्या स्टैंडवर यायला आवडायचे.

एवढच नाही तर ते लोक त्यांच्या ओळखीच्यांनाही अर्नेस्टोंच्या स्टँडवर जाण्यास सांगू लागले. सगळे रेस्टॉरंट्स त्यांच्या मेनुकार्डवर ज्या किंमती दिलेल्या असायच्या अगदी तेवढ्याच किंमतीची सर्विस आणि वॅल्यू द्यायचे.

पण अर्नेस्टों नेहमीच आहे त्या किंमतीपेक्षा जास्त value add करून देत. ते त्याच किंमतीमध्ये स्वादिष्ट जेवण आणि फाईव्हस्टार हॉटेल सारखी सर्विस द्यायचे. ते त्यांच्या ग्राहकांना असा अनुभव द्यायचे, ज्याच्या समोर इतरांची सर्विस अगदी फीकी पडायची.

म्हणून तर कस्टमर्सना त्यांचे रेस्टॉरंट खूप आवडू लागले. ते वारंवार त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जायचे आणि आपल्या मित्रांनाही याबद्दल सांगायचे.

तुम्ही असा विचार करत असाल की ही एक अशी बिझनेस आईडिया आहे ज्यामध्ये फक्त दुसऱ्यांना द्यायच, द्यायच आणि द्यायचच आहे, असं केल्यान तर तुम्ही भिकारी व्हाल, बरोबर? पण हे अजिबात खरे नाही. बिझनेस सुरू करताना तुम्ही किती पैसे कमवाल याचा विचार अजिबात करू नका.

त्याऐवजी तुम्ही तुमच्या कस्टमर्सना काय देऊ शकता, त्यांच्याकडून पैशाच्या बदल्यात तुम्ही कोणती सर्विस आणि किती वॅल्यू देऊ शकता याचा विचार केला पाहिजे. मग ही इमोशनल, फाइनांशियल किंवा परफॉरमंस वॅल्यू अशी कोणतीही वॅल्यू असू शकते.

तुम्ही जर फक्त यात वॅल्यू ऍड करत राहिलात, तर तुम्ही अधिकाधिक लॉयल कस्टमर्स तयार करत जाल. आणि ही गोष्ट तुम्हाला जास्त प्रॉफ़िट आणि सक्सेस मिळवुन देईल. तर स्ट्रॅटोस्फेरिक सक्सेस चा हा पहिला law आहे.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments