See you at the top (Marathi)
See you at the top by Zig Ziglar
(Introduction)
राल्फ वाल्डो इमर्सन 19th century च्या मध्यात ट्रान्सजेंडलिस्ट चळवळीचे नेतृत्व करणारे एक अमेरिकन Lecturer, Philosopher, व कवी होते. ते एकदा म्हणाले, “जे घडले आहे तो भूतकाळ आणि जे घडणार आहे तो भविष्यकाळ तितका महत्वाचा नाही.” मग तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या जीवनात कशाला महत्व देता? तुम्हाला वाटते का, तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेचा वापर केला आहे? तुम्ही आत्तापर्यंत तुमचा बेस्ट performance दिला आहे का? कदाचित तुमच्या मनात असा विचार येत असेल, तुम्ही जीवनात आतापर्यंत असे काहीही मिळवले नाही, जे तुम्ही deserve करता. हे सर्व विचार तुमच्या मनात गोंधळ घालत असतील, तर ही समरी तुमच्यासाठीच आहे. बर्याच वेळा तुम्ही लोकांकडे पाहत असाल आणि स्वतःला विचारत असाल "मी कधी असं बनू शकेल का?… माझ्याकडे हे किंवा ते असते तर मी यशस्वी झालो किंवा झाले असते." पण खरं सांगायचे झाले तर, ही खूप नकारात्मक विचारसरणी आहे. आत्ता, याक्षणी, तुमच्याकडे ते सगळं आहे जे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. कारण तुमच्याकडे तुम्ही स्वतः आहात आणि ते सगळं आहे जे तुम्हाला उच्च स्थानी घेऊन जाऊ शकेल. एका वयस्कर माणसाला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी समजते की, ज्या घरात तो इतक्या वर्षांपासून राहत होता, त्या घराखाली एक सोन्याची खाण आहे. ज्याच्या जवळ सोन्याची खान असेल तो जीवनात किती श्रीमंत असेल, हो ना? पण त्या माणसाला त्या खजिन्याची काहीच कल्पना नव्हती. त्याने आपले संपूर्ण आयुष्य त्या घरात, गरीबीत घालवले. जर त्याला आधीच त्या खजिन्याबदल समजले असते, तर त्याचे आयुष्य किती सुखात गेले असते. पण मरताना ही गोष्ट कळून काय फायदा. मित्रांनो,या गोष्टी मधून आपण काय शिकू शकतो? आपल्या सर्वांमध्ये अशीच एक सोन्याची खान असते, तिला योग्य वेळेत ओळखणे खूप गरजेचे आहे. म्हणून, तुम्ही त्या वृद्ध माणसासारखे होऊ नका. तुमच्यातील त्या सोन्याच्या खाणीस ओळखा. म्हणजेच तुमच्यात असणाऱ्या क्षमतेस योग्य वेळेतच (वेळीच) ओळखा. या पुस्तकाच्या सारांशचे उद्दीष्ट तुमच्या आत लपलेल्या पोटेंशियलचा वापर करणे आहे, तेचं तुम्हाला कृती करण्यात मदत करेल. ही समरी तुम्हाला क्षमता वाढविण्यासाठी प्रेरणा देईल. जेणेकरुन तुम्ही आणि तुमच्या सभोवतालचे लोक अधिक चांगले जीवन जगू शकाल. असे समजा तुम्ही सर्वात शेवटच्या स्टेप वर उभे आहात आणि टॉपला पोहोचू इच्छित आहात. टॉपला एक दरवाजा आहे जो येणाऱ्या उद्याचा आहे आणि या दारामागे सुख, शांती, संपत्ती, सुरक्षा, चांगले आरोग्य आणि बर्याच संधी आहेत. नक्कीच तुम्हाला देखील या दारा पर्यंत पोहचायचे आहे, पण तिथे जाण्यासाठी कोणतीही लिफ्ट नाही, अन्य कोणताही शॉर्टकट देखील नाही. तुम्हाला स्वतः स्टेप्सवर चालावे लागेल. तरचं तुम्ही तिथे पोहोचू शकाल. म्हणूनच, तुम्हाला एक एक स्टेप चढणे शिकावे लागेल. पहिली स्टेप म्हणजे self image ची आहे. दुसरी स्टेप म्हणजे इतरांशी असलेल्या आपल्या नात्याची आहे. तिसरी स्टेप म्हणजे लक्ष्य. चौथी स्टेप आहे दृष्टीकोन/attitude आहे. पाचवी स्टेप काम आणि शेवटची सहावी पायरी म्हणजे इच्छा/ desire. तर आता पहिले पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. तुमचा प्रवास आजपासूनच सुरू होत आहे. कचर्याप्रमाणे नकारात्मक विचार फेकून द्या. तुमच्या आत एक सोन्याची खाण आहे, एक दयाळू, हुशार व यशस्वी व्यक्ती तुमच्यात लपून आहे, परंतु तुम्ही टॉपला का पोहोचू शकत नाही? यामागचे कारण हे आहे की, तुम्ही आणखीनही नकारात्मक विचारास सोडले नाही. एक म्हण आहे "तुम्ही जिथे आहात तिथे यामुळे आहात, कारण तुमचीच तिथे राहण्याची इच्छा आहे." या म्हणीला मी थोडं अजून elaborate करते. कधी कुणाचा हृदय भंग होतो, कधी कुणाला जीवनात अनेक तडजोडी कराव्या लागतात किंवा कधी कुणाचे मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत मतभेद असतात. तर मग काय वाटतं? या सगळ्यांना आयुष्यात हेच हवं होतं का? तुमचं उत्तर नाही असेल पण विश्वास ठेवा की नका ठेऊ, या मागील खरं कारण म्हणजे त्यांचे विचार, त्यांचे नकारात्मक विचारच आहेत. अगदी लहानपणापासूनच आपल्याला जीवनाबद्दल नकारात्मक विचार सांगितले जातात. ते आपल्याला असे काहीतरी सांगतात, "तुम्ही केवळ हेच करू शकाल किंवा तुम्ही केवळ हेच होऊ शकाल पण वास्तविकतेमध्ये असे नाही. लोक तुम्हाला कितीही डिसकरेज करोत, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुमचे बैकग्राउंड काय आहे, हे महत्त्वाचे नाही, परंतु तुमचे या सुंदर जीवनात ध्येय काय आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करीत आहात हे महत्त्वाचे आहे. बरेच लोक त्यांच्या समस्यांसाठी पालकांना दोषी ठरवतात किंवा नातेवाईक, बॉस किंवा कम्यूनिटीला शिव्या देत असतात. तुम्ही मात्र हे करू नका. एका शहरात, एक मोठी कचराकुंडी होती. 100 वर्षे लोकं त्यांचा सगळा कचरा तिथेच टाकत राहिले, कचरा वर्षानुवर्षे जमा होत राहिला. आणि मग एक दिवस, काही प्रोग्रेसिव लोकांना त्या कचर्यामध्ये काहीतरी वेगळे दिसले. जेव्हा लोकांचा व्ह्यू पॉईंट बदलला, तेव्हा लोकांनी तेथील कचर्याऐवजी मोठे शॉपिंग सेंटर पहायला सुरुवात केली. मग पुढे, लोकांनी तेथे कचरा टाकणे थांबवले आणि त्या जागेला मातीने भरण्यास सुरूवात केली. तेथे एक चांगला पाया तयार होईपर्यंत ते माती भरत राहिले. काही वर्षातच तिथे, कचराकुंडीच्या ऐवजी शहरातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडले. ज्यात मोठी चमकणारी दुकाने सुरू झाली आणि तिथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळू लागल्या. त्या ठिकाणीहून जाताना लोकं नाक बंद करायचे. ते ठिकाण आता शहरातील सर्वात सुंदर ठिकाण बनले. हे कसे घडले! हे सर्व घडले कारण लोकांनी त्यांचे जुने विचार सोडून नवीन विचार करण्यास सुरुवात केली. तुम्हीही तुमच्या भूतकाळाच्या कचऱ्यातूनच फिरत आहात. पण त्याचा काही एक फायदा नाही, म्हणून आजपासून, आपल्या जीवनाचा पहिला दिवस समजून नवीन सुरुवात करा. TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE