Why Should You Read This Summary?
पुस्तकाविषयी:
याला तुम्ही फक्त एक पुस्तक समजू नका, तर हे पुस्तक एका बॉम्ब सारखं आहे. अश्निर ग्रोव्हर बद्दल टीव्ही आणि सोशल मीडिया वर पसरलेल्या फेक न्यूज आणि कॉंट्रोव्हर्सीज तर तुम्ही ऐकल्याच असतील. पण या समरी मधून तुम्हाला अश्निर ग्रोव्हर ने स्वतः या सगळ्या गोष्टींवर केलेला खुलासा वाचायला मिळेल.
तसेच तुम्हाला हे देखील समजेल की, त्यांनी 'भारत-पे' सारखी कंपनी कशी उभी केली. कोटक बँकर्स सोबत असलेल्या प्रॉब्लेम्स ची सुरुवात कशी झाली? ती व्हायरल ऑडीयो फाईल नक्की कुठून आली? कोणत्या सिच्युएशन मध्ये आणि कोणत्या कारणांमुळे अश्निर ने कंपनी मधून रिझाईन केलं? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या समरी मधून मिळतील.
ही समरी कोणी वाचायला हवी?
- स्टार्ट-अप फाउंडर्स आणि एम्प्लॉईज ने
- शार्क-टॅंक च्या फॅन्स ने
- ज्यांना अश्निर ने स्वतःहून केलेला सत्याचा खुलासा ऐकायचा असेल
लेखकाबद्दल:
अश्निर ग्रोव्हर हे 'भारत-पे' या कंपनी चे फॉर्मर को-फाऊंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याआधी ते कोटक बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर आणि ग्रोफर्स मध्ये सी.एफ.ओ. म्हणून काम करत होते. त्यांनी आय.आय.टी. दिल्ली मधून सिव्हिल इंजिनियरींग केली आणि त्यानंतर आय.आय.एम. अहमदाबाद मधून एम.बी.ए. चा कोर्स केला. ते 'शार्क-टॅंक इंडिया' या टीव्ही शो च्या पहिल्या सिझन मध्ये पॅनल मेंबर सुद्धा होते. ते $240 मिलियन इक्विटी असलेले 'भारत-पे' चे एक इंटर्प्रिन्युर, इन्व्हेस्टर आणि भारत-पे चे सगळ्यात मोठे इंडिव्हिज्युअल शेयरहोल्डर आहेत.